नागपुर जिह्यात बोट बुडाल्याने पाच महिला नदीत बुडाल्या, सर्वीकडे शोकलहर.
✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
नागपूर, दि.20 :- नागपूर जिल्हातील कुही येथुन एक मन हेलवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे संपुर्ण गाव शोकाकुल झाल आहे. नावेतून प्रवास करत असताना नाव उलटली यात पाच महिला बुडाल्या. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला वाचली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कुही येथे आज सकाळच्या सुमारास या पाचही महिला कापूस वेचण्यासाठी आणि मिरची तोडणीसाठी आम नदी ओलांडून जात होत्या. शेतमालक परमानंद तिजारे यांच्या शेतातून त्या नावेने जात होत्या. नदीच्या पात्रात अचानक नाव फुटली. त्यामुळे नावेत पाणी शिरले आणि नाव बुडाली. या महिलांना बचावासाठी आरडोओरड केली. मात्र, त्यांना नागरिक बचावाला जाण्यासाठी जाईपर्यंत नाव बुडाल्याने या महिला गंटागळ्या खात होत्या. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातील गीता रामदास निंबारते यांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे या चार महिला वाचल्या आहेत. मात्र यातील दोघींवर मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांच्यावर नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.
चिमुकल्या बाळाच्या आईच मृत्यू.
नाव डुबलेल्या या दुर्घटनेमध्ये नावेत बसुन असलेल्या या गीता रामाजी निंबर्ते यांचा मृत्यू झाला आहे. गीता यांना दीड वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. घरी मुलगा, पती आणि त्याच होत्या. आता त्यांचा मृत्यू झाल्याने या मुलाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व महिला मौजा कुजबा येथील असल्याचं सांगितलं जात आहे.