महाराष्ट्रात माघिल 24 तासात 43 हजार कोरोना रुग्णांची नोंद, मृत्यूसंख्येत वाढ.

महाराष्ट्रात  24 तासात 43 हजार कोरोना रुग्णांची नोंद, मृत्यूसंख्येत वाढ.

महाराष्ट्रात माघिल 24 तासात 43 हजार कोरोना रुग्णांची नोंद, मृत्यूसंख्येत वाढ.

 

✒मुकेश चौधरी, उपसंपादक✒
📲7507130263

महाराष्ट्र:- राज्यात कोरोना वायरस आणि ओमिक्रॉन वायरसच्या वेरियंट महामारीचे जाळे घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसा गणित कोरोना वायरस आणि ओमिक्रॉन वायरसचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळुन येत आहे. त्यामूळे लोकांच्या मनात भितिचे वातवरण निर्माण झाले आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात माघिल 24 तासात कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 158, मुंबईतील 31 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. तर, 1091 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मिडिया वार्ता न्युज महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करते कि, आपण मास्क घालावे, स्वच्छ हात धुवावे, गर्दीचा स्थिकानी जाण्यास टाळावे. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here