पालक वर्ग गेला का झोपी? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

56

पालक वर्ग गेला का झोपी?

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

पालक वर्ग गेला का झोपी? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड : – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सतत अठरा महिने शाळा बंद राहिल्या. त्यानंतर एक डिसेंबरला जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या परंतु पुन्हा जानेवारी लागताच कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आणि शाळा-महाविद्यालये बंदचे आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आणि तालुक्यात “पालक झोपी गेला का”असा संदेश सोशल मिडीयावर चांगलाच घुमू लागला आहे. 50% क्षमतेने सिनेमा थेटर आणि बार सुरू आहेत. बाहेर खेळायला आणि सिनेमा पाहायला विद्यार्थी गेले तरी चालतात आणि शिक्षण मात्र थांबले आहे .मागील 18 महीने शिक्षण थांबले आहेत पालक वर्ग आवाज का उठवत नाही असा संदेश सोशल मीडियावर जिकडे तिकडे फिरु लागला आहे .जेमतेम शाळा सुरू झाले होते आणि अचानक बंद झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये खूपच प्रमाणात नाराजी ओढवली आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत प्रशासन खेळ खेळत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शाळा बंद बाबतचा घेतलेला निर्णय हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे .एकीकडे ऑनलाइनची या काळात सक्ती करत असताना ग्रामीण भागात सेवा उपलब्ध होत नाही. अनेक पालकाजवळ स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. पोटाची चिंता करत असताना नेट साठी खर्च कुठून करणार हा प्रश्‍न ग्रामीण भागातील नागरिकांसमोर उभा आहे .अशा वेळेस ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवणे योग्य राहील— संजय गजपुरे भाजपा जिल्हा महामंत्री,तथा जिल्हा परीषद सदस्य चंद्रपूर