गटसाधन केंद्र नागभीड येथे शिक्षणप्रेमी स्वयंसेवकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण

63

गटसाधन केंद्र नागभीड येथे शिक्षणप्रेमी स्वयंसेवकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण

गटसाधन केंद्र नागभीड येथे शिक्षणप्रेमी स्वयंसेवकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड- पंचायत समिती नागभीड येथील सभागृहात दिनांक 19/1/2022 ला स्वयंसेवकांचे प्रशिक्षण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी मॅडम यांच्या संकल्पनेतून राबवित असलेल्या कोविद-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने प्रेरित ‘शिक्षणदान उपक्रम’ अंतर्गत प्रत्येक गावातून उच्च शिक्षित शिक्षणप्रेमी स्वयंसेवक तयार करून शिक्षनदानाचे पवित्र कार्य सुरू आहे.
विद्यार्थ्यांना गावातच स्वयं सेवकांच्या मदतीने योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून तालुक्यातील सर्व स्वयं सेवकांचे प्रशिक्षण प.स. नागभीड चे गटशिक्षणाधिकारी मा.नाट साहेब यांचे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनात पार पडले. ह्या प्रशिक्षणात प्रथम फाऊंडेशन चे प्रतिनिधी श्री. ठाकरे सर ह्यांनी शिक्षनदानाचे महत्व विद्यार्थ्यांना उपयुक्त वाचन कौशल्य विकसित होण्याकरिता कृतीयुक्त मार्गदर्शन केले.. कु.बाली मडावी (विषयतज्ज्ञ), श्री. जे.के.राऊत (विषयतज्ज्ञ),श्री. यु.बी.बन्सोड (विषयतज्ज्ञ),श्री.राहुल पोशट्टीवार(विषयतज्ज्ञ), ह्यांनी आपल्या विषयानुसार मार्गदर्शन केले.
श्री.विलास सहारे (विषयतज्ज्ञ), व श्री.विकास कुंभरे (स.शी.त.) ह्यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले