खबरदार! प्लास्टिक कॅरी बॅग सापडल्यास तब्बल पाच हजारांचा होणार दंड

46

खबरदार! प्लास्टिक कॅरी बॅग सापडल्यास तब्बल पाच हजारांचा होणार दंड

खबरदार! प्लास्टिक कॅरी बॅग सापडल्यास तब्बल पाच हजारांचा होणार दंड

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 20 जानेवारी
मनपातर्फे शहरात नियमित स्वच्छता करण्यात येते मात्र कचऱ्यात मिळणाऱ्या प्लास्टिक पिशवीचे प्रमाण खूप वाढले आहे. ही एक मोठी समस्या झाली आहे.
राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशवी प्लास्टिक कॅरी बॅगला सक्षम पर्याय ठरणार आहेत. आपल्या शहरातील व्यापाऱ्यांनी जर कापडी पिशवीचाच वापर करण्याचा निर्धार केला तर ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरीत्या पोहोचवेल, असा विश्वास आयुक्त विपीन पालीवाल यांनी व्यक्त केला. दरम्यान प्लास्टिक कॅरी बॅग आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मनपाच्या डम्पिंग यार्डमध्ये येणाऱ्या कचऱ्यात प्लॉस्टिकच्या वस्तू असल्याने त्याला वेगळे काढणे ही मोठी समस्या आहे. कोणतेही आवश्यक सामान घेण्यासाठी प्रत्येकाने कापडी पिशव्यांचा वापर करायचे ठरवले व व्यापाऱ्यांनी जर कापडी पिशवीच द्यायचे ठरविले तर हा प्रश्न कमी होऊ शकतो.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचतगटांद्वारे बनविल्या जाणाऱ्या या कापडी पिशवीवर क्युआर कोड उपलब्ध असून या कोडला मोबाइलने स्कॅन करताच कापडी पिशवी मिळण्याच्या ठिकाणांची माहिती आपल्याला मिळते.