सोरट-फुलपाखरू जुगार यांच्यावर नेरळ पोलीसंची धडाकेबाज कारवाही
✒️संदेश साळुंके
नेरळ रायगड प्रतिनिधी
📞9011199333
नेरळ;- नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत मौजे दामात येथील क्रिकेटच्या मैदानासमोर मोकळ्या जागत दिनांक १९ जानेवारी २४ रोजी मटका जुगार खेळत असल्याचे फिर्यादी आणि सांगितले त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार किसवे यांनी चौकशी केली असता चंद्रकांत मालू मिसाळ, अर्जुन पांडुरंग ठमके व आकाश सुरेश मिसाळ तिघेही राहणार वंजारपाडा रंगे हाथ पकडले व त्याच्याकडून स्वतःच्या फायद्या करीता बेकायदेशीर रित्या ग्राहकांकडून पैसे घेऊन सोरट फुलपाखरू जुगार चालवीत असताना मिळून आले. त्या अनुषंगाने त्यांच्यावर १८८७ चे कलम १२ अ प्रमाणे 01/2024 दाखल करून, रोख रक्कम रुपये चार हजार चाळीस व पप्पूप्ले पिक्चर्स असा बारा चित्रांचा कागद बरामात केला तसेच सी.आर.पीसी. ४१ प्रमाणे आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. पण ह्या मुळे सोरट खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.