तिन्ही गावाच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित भविष्य उज्वल करण्यासाठी खेळ आणि शिक्षणाला महत्त्व द्यावे – मा. अनील दहिवले

57
तिन्ही गावाच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित भविष्य उज्वल करण्यासाठी खेळ आणि शिक्षणाला महत्त्व द्यावे - मा. अनील दहिवले

तिन्ही गावाच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित

भविष्य उज्वल करण्यासाठी खेळ आणि शिक्षणाला महत्त्व द्यावे – मा. अनील दहिवले

तिन्ही गावाच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित भविष्य उज्वल करण्यासाठी खेळ आणि शिक्षणाला महत्त्व द्यावे - मा. अनील दहिवले

✍️ भवन लिल्हारे भंडारा / गोंदिया प्रतिनिधी📱 मो.नं.9373472847📞

गोंदिया : दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी गोंदिया जिल्ह्यातील केसलवाडा , कोदामेडी ,अर्जुनी सडक या तिन्ही गावच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि क्रिकेट स्पर्धा दुपारी १२.०० वाजता सुरू करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपसभापती मा. अनील दहिवले यांनी दीप प्रज्वलित करून मार्गदर्शन करताना क्रिकेट खेडळूंना क्रिकेट बरोबरच आपले भविष्य उजवल करण्यासाठी शिक्षणाला महत्व द्यावे, आणि रोजगाराच्या संधी ही शोधावी. आणि बेरोजगारी कंत्राटीकरणं यामुळे शासन संविधानालाच छेद देण्याचे व युवकांचे लक्ष इतरत्र भटकवण्यासाठी राजकारणामध्ये सांप्रदायिक तत्व कसे आणले जातात या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये सांघिक खेळांना अधिक महत्त्व आहे. आजच्या विद्यार्थी उद्याच्या सुदृढ नागरिक व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेने शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन करून विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून दिले आहे. जे खेळाडू जिंकले त्यांचे अभिनंदन व जय हरले त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी खचून न जाता आपल्या सोबत जिंकलेल्या खेळाडूंचे अनुकरण करून आपणही पुढे कसे जिंकू यासाठी कसोटीने सराव करावा. “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. “असे प्रतिपादन उपसभापती अनिल भाऊ दहीवले कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव यांनी केले.
ह्यावेळी प्रदेश प्रतिनिधी महा.प्रदेश काँग्रेस कमिटी तथा जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा गोंदिया निशांत राऊत जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस , किशोर डोंगरवार सर, नगराध्यक्ष तेजराम मडावी , न. प.अर्जुनी सडक , उपाध्यक्ष वंदनाताई डेंगरवार न. प.अर्जुनी सडक , हितेश डोंगरे सामजिक कार्यकर्ता , सरपंच पुसांमजी आणि मंचावर इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.