श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवानिमित्त २२ जानेवारीला दारू व मांसाहाराची दुकाने बंद ठेवा
• श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव समिती, घुग्घुसची मागणी
🖋️ साहिल सैय्यद
📱 93079 48197
घुग्गुस : 20 जानेवारी
घुग्घुस येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर उत्सव समितीतर्फे शनिवार, २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घुग्घुस पोलिस ठाण्यात श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवानिमित्त २२ जानेवारीला शहरातील दारूची व मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
साडे पाचशे वर्षानंतर राम मंदिराचे निर्माण झाले आहे. २२ जानेवारीला या विशाल मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम मोठया भव्यतेने आयोजित करण्यात आला आहे.
घुग्घुस शहरात सुद्धा हा उत्सव मोठया भव्यतेने साजरा करण्यात येत आहे. २१०० महिलांची भव्य कलश यात्रा आयोजित करण्यात आली आहे सोबत विविध झाकीयां व पथक राहणार आहे.
घुग्घुस शहराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय राहणार आहे अशा परिस्थितीत दारूची व मांसाहाराची दुकाने सुरु ठेवणे हे भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी गोष्ट ठरेल.
यावेळी श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना समिती घुग्घुसचे संयोजक विवेक बोढे, ठाणेदार आसिफराजा शेख, अमोल थेरे, कुलदीप इंगोले, अनिल गुप्ता, हनुमान खोके, सुनील राम, सतीश बोन्डे, राकेश भेदोडकर, अनुप भंडारी, शुभम कोयडवार, सोनू शेट्टीयार, स्वामी फसलावार आदींची उपस्थिती होती.