म्हसळा युवासेना तालुका अधिकारी श्री.कौस्तुभ विलास करडे यांची तालुका आरोग्य यंत्रणेवर बारकाईने लक्ष

208

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

म्हसळा : ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या डायलेसिस सेंटरचे काम वेगाने सुरू असून, याबाबतची पाहणी म्हसळा युवासेना तालुका अधिकारी श्री.कौस्तुभ विलास करडे यांनी केली. या सेंटरच्या उभारणीमुळे परिसरातील मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे त्यांनी सांगितले.

डायलेसिस सेंटरच्या उभारणीबाबत संबंधित ऑपरेटरने महत्त्वाची माहिती दिली. या सेंटरमध्ये रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधांसह दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः परिसरातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना  सेवा देणे हा प्रमुख उद्देश आहे.

या कामाचा आढावा घेताना संबंधित ऑपरेटरकडून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यात आली. सुसज्ज यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे केंद्र तयार होत आहे. परिसरातील रुग्णांना योग्य  वेळेत सेवा उपलब्ध व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना म्हसळा तालुका अधिकारी  श्री.कौस्तुभ विलास करडे व त्याच्या सोबत म्हसळा शहर प्रमुख श्री. विशाल सायकर हे उपस्थित होते. डायलेसिस सेंटरच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते रुग्णांसाठी कार्यान्वित होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.