मुंबई : केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या नावाने घोषणा करत अयोध्या दौरा आयोजित करून मोठी जाहिरातबाजी देखील केली. दरम्यान, भाजपवर दबाव वाढण्यासाठी ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा दिली. परंतु त्या घोषणेला त्यांनी स्वतःच तीरांजली दिली आहे. आज त्यांनी अयोध्येत मंदिर बनण्यापूर्वीच सरकार बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत भाजपसोबत आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संसार थाटण्याची अधिकुत घोषणा केली आहे.

गेले काही दिवस भाजपा व शिवसेनेत युती होणार की नाही याबद्दल शिवसेना व भाजपात साशंकता होती. मात्र, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीकेसी एमसीए येथे पत्रकार परिषद अधिकृत घोषणा केली आहे.

पुलवामा येथे दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ ‘च्या तब्बल ४० जवानांना वीर मरण पत्करावा लागलं होतं. त्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल झालेला असताना आणि तितक्याच प्रमाणात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर रात्री युतीबाबत महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी शिवसेनेकडून शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीची गुप्तता ठेवण्यात आली होती. परंतु, प्रसार माध्यमांमुळे ते लपून राहील नाही आणि त्यानंतर भाजप-शिवसेनेवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here