लोहिया विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

टि. सातकर गोंदीया जिल्हा प्रतिनिधी
सौन्दड:- येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच रामदेवबाबा अध्यापक विद्यालय सौन्दड यांच्या सयूंक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक “छत्रपती शिवाजी महाराज “यांची जयंती मा. जगदीश लोहिया संस्थापक,संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखालीमोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल व प्रमुख अतिथी प्राचार्य मा.गुलाबचंद चिखलोंडे यांनीं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी मा.गुलाबाचंद चिखलोंडे तसेच विद्यालयातील सहा.शिक्षक श्री. के.के.कापगते यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषनाद्वारे शिवाजी महाराजांच्या कार्यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाला शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कु.यु. बी.डोये यांनी केले तर आभार श्री. डी. ए. दरवडे यांनी मानले. कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.