हिंगणघाट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

56

हिंगणघाट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebration on behalf of Hinganghat Deprived Bahujan Aghadi.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebration on behalf of Hinganghat Deprived Bahujan Aghadi.

प्रशांत जगताप प्रतीनीधी 19 फेब्रुवारी
हिंगणघाट:- आज छत्रपती शिवाजी जयंती निमित्त संत चोखाबा वार्ड येथे वंचित बहूजन आघाडीचे कुणाल वासेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सर्वत प्रथम तथागत बुद्ध यांना महादेव कुंभारे यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंचित आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ नेते अशोक रामटेके यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले. महात्मा जोतिबा फुले यांना गोविंद मुळे यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रकाश भुसारी यांनी माल्यापर्ण करुन अभिवादन केले. माता रमाई यांना गौरव जोडाणगडे यांनी अभिवादन केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebration on behalf of Hinganghat Deprived Bahujan Aghadi.
नंदिनी सिद्धार्थ जामनकर यांनी गौतमी बुद्ध विहाराला रयते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करून दिली. अशोक रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन गाथेवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख विक्रांत भगत, सिद्धार्थ जामनकर, अशोक खैरकार, एकनाथ भगत, नामदेव वानखेडे, मंजुषा भगत, नंदिनी जामनकर, स्नेहा वासेकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ललित धनविज यांनी केले तर आभार अजय डांगरे यांनी मानले.