पेट्रोल भरताना फसवणूक होतेय? तर सतर्क राहून ‘अशी’ घ्या काळजी!

56

पेट्रोल भरताना फसवणूक होतेय? तर सतर्क राहून ‘अशी’ घ्या काळजी!

Fraud while filling petrol? So be careful and take care!
Fraud while filling petrol? So be careful and take care!

प्रशांत जगताप प्रतिनिधी 20 फेब्रुवारी

आज काही पेट्रोल पंप वर मोठ्या प्रमाणावर जनतेची लूट आणी फसवणूक होत असल्याचे अनुभव येत असल्याचे समोर येते. खालील काही सोप्या पद्धती वापरल्यास तुमची फसवणूक होणार नाही.

इंधन सूचक तपासणे आवश्‍यक
पेट्रोल किंवा डीझेल भरण्यापूर्वी, इंधन वितरक मशीनचे इंधन मीटर तपासा. आपणास हे लक्षात ठेवले पाहिजे की ते इंधन भरण्यापूर्वी शून्याने सुरू होते. इंधन भरल्यानंतर इंधन निर्देशक पाहा.

फिक्‍स पेमेंटने इंधन भरू नका
बहुतेक लोक 100 रुपये, 200 किंवा 500 रुपयांचे फिक्‍स पेमेन्टने त्यांच्या दुचाकी किंवा कारमध्ये पेट्रोल भरतात. मात्र आधीपासूनच पेट्रोल डिस्पेंसर मशीनमध्ये हे नंबर सेट केलेले असू शकते. त्यामुळे 102, 205, 515 रुपयांचे इंधन भरा.

पेट्रोल पंप अटेंडंटवर लक्ष ठेवा
पेट्रोल भरत असताना पेट्रोल पंप अटेंडंट फ्युएल थांबवून पुन्हा सुरू करतो. हे पेट्रोल चोरीचे लक्षण असू शकते. कारण पेट्रोलचे प्रमाण निश्‍चित झाल्यावर नोझल बंद करण्याची गरज नाही.

अशी करा तक्रार
1. पेट्रोल पंप व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार.
2. ज्या कंपनीचे पेट्रोल पंप आहे, त्याच्या ग्राहक सेवेकडे तक्रार करा. हे सर्व क्रमांक पेट्रोल पंपांवर उपलब्ध असतात.
3. तक्रार पुस्तकात तक्रार लिहू शकता.
4. न्यायालयात तक्रार देखील करू शकता.