मराठा विश्वभूषण पुरस्कार आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना प्रदान.

49

मराठा विश्वभूषण पुरस्कार आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना प्रदान.

Maratha Vishwabhushan Award presented to Prashant Savvalakhe, Mayor of Arvi.
Maratha Vishwabhushan Award presented to Prashant Savvalakhe, Mayor of Arvi.

आशीष अंबादे प्रतिनिधी 

आर्वी:- राष्ट्रीय मराठा सेवा संघातर्फे राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च मराठा विश्वभूषण पुरस्कार दिल्या जातो. आर्वी उपजिल्हा विभागातून मराठा सेवा संघाने आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना आज 19 रोजी शिवजयंतीच्या पर्वावर प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्र जाणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रिपल राणे, डॉ.हरिभाऊ वेरुळकर, अनिल गोहाड, बाळा जगताप, निलेश देशमुख यांची उपस्थिती होती. 
 
आर्वी नगरीतील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, वैद्यकिय अधिकार्‍यांसह नपतील सहकार्‍यांना सोबत संचारबंदीच्या काळात आर्वी शहरात फिरुन आरोग्य विषयक आणि सुरक्षितेबाबत संदेश दिले. घरात राबणार्‍या आणि कुटुंबाचे रक्षण करणार्‍या आई भगिनींसाठी राज्यस्तरावर ‘आठशे खिडक्या नवशे दारं’ नावाचा अभिनव उपक्रम राबवून विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नगराध्यक्ष सव्वालाखे यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन प्रफुल्ल क्षीरसागर यांनी तर विजय चौधरी यांनी आभार मानले.