हवं तर बलात्कार कर, पण मारून नको टाकूस; पीडितेची आरोपीकडे गयावया, पण तिच्या डोक्यात घातला दगड.

50

हवं तर बलात्कार कर, पण मारून नको टाकूस; पीडितेची आरोपीकडे गयावया, पण तिच्या डोक्यात घातला दगड.

Yes, rape, but don't kill; The victim went to the accused, but a stone was thrown at her head.
Yes, rape, but don’t kill; The victim went to the accused, but a stone was thrown at her head.

प्रतिनिधी 19 फेब्रुवारी

मध्य प्रदेश:- आज देशात महीला अत्याचाराच्या घटनेमुळे आहाकार माजला आहे. आज भारतात महिला सुरक्षीत नसल्याचे अनेक घटने वरुन समोर येत आहे. आता मध्य प्रदेश मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एक 24 वर्षीय महीले बरोबर बलात्कार करुन जिवानीशी ठार मारण्याची घटनेने संपुर्ण देश हादरला आहे

बलात्काराला विरोध करत होती म्हणून नरधमाने पीडितेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता. पीडित मुलगी आरोपीकडे गयावया करत होती, पण आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. हे प्रकरण इतके गंभीर असूनही ही साधी छेडछाडीची घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

16 जानेवारी रोजी भोपाळमध्ये एक 24 वर्षीय तरुणी संध्याकाळी बाहेर पडली होती. तेव्हा एका तरुणाने तिला धक्का दिला आणि एका खड्ड्यात पाडले. त्यात तरुणीचा पाठीचा मणकाच मोडला. नंतर तरुणाने तिला फरफटपत झाडांच्या मागे नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने विरोध करताच त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. तेव्हा मुलीने हवं तर बलात्कार कर पण जिवे नको मारू अशी गयावया केली. नंतर नराधम तरुणाने तिचे शरीर ओरबाडले, तेव्हा मुलीने आरडाओरड केला. तिचा आवाज ऐकून काही लोकांनी तिकडे धाव घेतली तेव्हा आरोपीने तिथून पळ काढला. काही लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पण ही घटना केवळ छेडछाडीची असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस अजून तपास करत आहेत.