चोरट्यांनी केला आहे परत एकदा गाडी वर हात साफ
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809
चंद्रपूर – चंद्रपूर मध्ये बाबुपेठ हा गुन्हेगारी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून इथे कोणत्याही प्रकारची गुन्हे सामान्य मानून बाबुपेठ मध्ये वस्तू व मानव सुरक्षित नाही आहे असे म्हटले तरी चालेल पुन्हा एकदा बाबुपेठ परिसरातून गाडी चोरीला गेली आहे दि. १६/०२/२२ रात्री8 ८ च्या दरम्यान गोकुल बार समोर पार्क असलेली ( MH34 ) (AG8467 ) हिरो होंडा स्प्लेंडर प्लस असा गाडीचा वर्णन आहे सचिन भरत रुयारकर यांची गाडी आहे सचिन भरत रुयारकर यांच्या घरी लग्न असल्याने पाहुणे मंडळी चा जमाव झाला हळदी चा कार्यक्रम सुरू होता तेव्हा भाटव्याचा मानपान करण्यासाठी सचिन राहणार महादेव मंदिर बाबुपेठ गोकुल बार बसले असता त्याच वेळी गोकुल बार च्या आवारात पार्क असलेली मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु घरी लग्नाचं कार्यक्रम असल्याने परिपुर्ण माहिती करता आली नाही पण काल दि. १९/०२/२२ सकाळी लवकर जाऊन बार मध्ये CCTV कॅमेरा तपासणी केली असता त्यात त्या चोरट्याचा छायाचित्र अंकित झालेले दिसून येत आहे त्या चोरट्यांनी तिथे असलेल्या सर्व गाड्याला चावी लावून लावून बघत होता त्या नंतर ठेवलेल्या सचिन नामक वैक्तीच्या गाडीला चावी लागली त्यामुळे तो चोर तिथून सहज पने निघून गेला आता आज CCTV मध्ये रेखाटलेले छायाचित्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार असून आपण आपल्या मीडिया वार्ता न्यूज द्वारे एक छोटासा प्रयत्न करत आहे सदर गाडी कोणालाही आढळल्यास ह्या नंबर वर संपर्क साधावा 9529811809