छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्सव थाटामाटात साजरी करण्यात आली
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
भद्रावती
येथे नुकताच स्कारपीअन डान्स अकादमी भद्रावती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू
गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी केले
तर प्रमुख पाहुणे म्हणून
शिवम गणवीर इ टी वी तेलगू डी च इ इ ३७ टी वि कलाकार व प्रोफेशनल
कोरीयर ग्राफर व डान्स मास्टर नागपूर / सागर मामीडवार संथापक अद्यक्ष स्कारपअन अकादमी भद्रावती व डान्स मास्टर / आशिष पाटील डान्स मास्टर / प्रशांत सातपुते डान्स मास्टर / अर्शद डान्स मास्टर / जय डबरे डान्स मास्टर / भागर्वी वाबीटकर डान्स मास्टर इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या अद्यक्ष स्थानावरून राजू गैनवार म्हणाले की इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती राजे शिवाजी महाराज
व सर्व शिवभक्तांना शिव जयंतीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्या
अन्यायाच्या विरुद्ध कणखर पणे उभा राहणारा राजा स्रियापती नितांत आदर ठेवणारा राजा आपल्या मावळ्यावर जीवापाड प्रेम करणारा विविध जाती धर्मातील मावळ्यांना एक करून सर्वाना योग्य न्याय देणारा राजा इतिहासाच्या हजारो पानावर हजारो राजे होऊन गेले परंतु असा राजा होणे नाही
रयतेचा राजा अस म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजा शिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींने रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार ३९२ वी जयंती आहे शहाजी राजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यतील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिव जयंती म्हणून साजरा होतो शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिव शंभू असा होतो शिवाजीच्या कारकिर्दीला शिवकाल असेही म्हणतात राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी
प्रोसाहन दिले शिवाजी महाराज यांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्यावर झाला वयाच्या ५० व्या वर्षी स्वराज्य सोडून गेले हिंदवी स्वराज्याचे संथापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस समाजाच्या सर्व स्तरावरून शिव जयंती साजरी होताना प्रत्येक जण आप आपल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकापर्यंत पोहोचावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८७० साली शिव जयंती सुरू केली जी पहिली शिव जयंती होती
आजच्या तरुण पिढीने भारत देश महासत्ता बनने करिता शिक्षणाच्या मध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे तरच खरी शिव जयंती साजरी होईल असे प्रतिपादन केले
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रजनन करण्यात आले
सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्प मालेने स्वागत करण्यात आले आणि प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन सुद्धा झाले
छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा सूरज
बाराहाते यांनी साकारली होती
या कार्यक्रमाचे संचालन
मृगया खोब्रागडे यांनी केले तर प्रास्ताविक आर्षभा
घोरपडे यांनी केले व आभार प्रदर्शन खुशी घोटेकर यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता आरोही शिंदे व स्वरा धुमने आणि स्कार्पिअन डान्स अकादमी भद्रावतीचे सर्व विद्यार्थी व पदाधिकारी आणि सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले