कु. दुशिला मेश्राम (दरेकार) मराठीत नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

55

कु. दुशिला मेश्राम (दरेकार) मराठीत नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

कु. दुशिला मेश्राम (दरेकार) मराठीत नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

✍मारोती कांबळे✍
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी -9405720593

एटापल्ली : -हिंगणा अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, वानाडोंगरी, ता हिंगणा, जि. नागपूर येथील मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असणान्या कु दुशिला नेताजी मेश्राम (दरेकार) यांनी 26 सप्टेंबर 2021 ची सेट व 24 नोव्हेंबर 2021 ला घेण्यात आलेली नेट या दोन्ही परीक्षा मराठी विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेतील शिक्षिका प्रियंका डांगेवार, रेखा राठोड, पंकज लेदाडे सर, स्वाती गादेवार, रंजना गजाम, कौरती मॅडम, सुकेशिनी मेश्राम, जितेंद्र किरणापुरे, रेखा आवारी, सुनिता राऊत, प्रा. डबाले सर, प्रा. सोनकांबळे सर, प्रा. दुर्गे सर, प्रा. डॉ. भगत सर समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, विद्यार्थीनी आणि कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले. दुशिला मेश्राम यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे पती प्रा. डॉ. विश्वनाथ दरेकार यांना आणि स्वतःच्या मेहनतीला दिले आहे. दुशिला मेश्राम हया सामाजिक न्याय विभागात गेल्या 8 वर्षापासून मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत असून त्या उत्कृष्ट कवयित्री आणि गझलकार आहेत. त्यांना गझल लेखनासाठी अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत.