बिरणवार ग्राहक सेवा केंद्र मांडेसर द्वारा शिवजयंती साजरी
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- भंडारा जिल्हा, मोहाडी तालुक्यात येणारे मांडेसर गावात, ” प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ”
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला मौजा मांडेसर येथे ३९२ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती बिरनवार ग्राहक सेवा केंद्र येथे साजरी करण्यात आली.
या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा मध्ये ग्राम मांडेसर येथील शिवभक्त गृपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते, या गावातील जेष्ठ विचारवंत नागरिक व ग्रामवसी उपस्थित झाले,
या मांडेसर गावचे प्रथम नागरिक म्हणुन मा.श्री. गुलाबजी सव्वालाखे, (सरपंच ग्राम प. मांडेसर) मा.श्री. रोशनजी लिल्हारे ( उपसरपंच ग्राम पंचायत मांडेसर ) मा.श्री. हावसूलालजी बिरणवार ( यल आय सी अभिकरते ) मा. श्री. धनराजजी गराडे ( यल आय सी अभिकर्ते ) मा.श्री. प्रकाशजी नागपुरे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री. दुलीचंदजी लिल्हारे (सामाजिक कार्यकर्ते) मा.श्री.सूर्याभाऊ बिरनवारे ( ग्राहक सेवा केंद्र मांडेसर ) मा.श्री. सूर्यकिरण लिल्हारे, मा.श्री.मनोज दमाहे, मा.श्री.जयपाल खोकले, मा.श्री.प्रशांत नागपुरे ( यन वाय बी मोहाडी तालुका ) मा.श्री. चंद्रकिरन बिरनवार, मा.श्री. नरेश बिरनवार, मा.श्री.मिलिंद दमाहे. मा.श्री. रविजी बशिने, मा.श्री. आकाश दमाहे व शिवभक्त कार्यकर्ते आणि मांडेसर ग्रामवासी उपस्थित होते.
जगाच्या पाठीवर समतेचे व न्यायाचे राज्य निर्माण करुन माणसातील माणूसपण जागृत करणारे मानवतेच्या अस्मितेचे जनक विश्ववंद्य कुळवाडीभूषण ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांची जयंती साजरी करण्यात आली,
१९ फेब्रुवारी हा दिवस शिवजन्मोत्सवाचे दिवस म्हणुन शिवशाही युवक मित्र परिवार तर्फे दरवर्षी साजरा करण्यात येतो, हा कार्यक्रम संपुर्ण देशभरात मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो, या दिवशी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जय जयकार गाजत असतात, या जयंती सोहळात मैदानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी, कला अवगत असलेले अनेक कार्यकर्ता आपली कला दाखवितात,
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आयोजक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रथम ” विर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, व महाप्रसाद वाटप करुन जय शिवराय, जय शंभुराजे, जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ, असे जैकारा लावून कार्यक्रम संपविण्यात आले.