बनोटी शाळेत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बनोटी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त
ग्रामस्थ यांनी केले कौतुक
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8984248048
माणगाव – १९ फेब्रुवारी २०२४ रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनोटी या शाळेत शालेय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा सादर करत शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला. शाळास्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, घेण्यात आल्या. यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ व महिला मंडळ आवर्जून उपस्थित होते. यावेळी बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव ताम्हणे येथील अर्चना येलवे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले, तसेच मिनाक्षी जैन मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा परिसर पाहून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ यांचे कौतुक केले. यावेळी बनोटी गावचे ग्रामस्थ व सरपंच साहेब यांनी म्हसळा तालुका स्तरावर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनोटी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तृतीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री जयसिंग बेटकर सर आणि विद्यार्थी, शाळा कमेटी यांचे मनापासून भरभरून कौतुक केले. शाळेतील हुशार बालके ओम खारगावकर, रूत्विक गाणेकर,जैती कांबले, आरोहि म्हात्रे,प्रज्ञा कांबळे, साई कांबळे,मेघराज गाणेकर, रोहन खारगावकर , रूद्राणी कांबळे, हार्दिक खारगावकर, प्रथमेश खारगावकर, अस्था म्हात्रे आदी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री जयसिंग बेटकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षण प्रेमी भावेश गाणेकर यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा परिधान केल्याने सुंदर वातावरण निर्मिती झाली होती गावातून रॅली चे नियोजन करून चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ, माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी, क्रीडा प्रेमी सहभागी झाले होते