कोरपना तालुका भाजप तालुका अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण
प्रतिनिधी मो.9923358970
कोरपना :- कोरपना तालुक्यात भाजप तालुका अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून तालुका अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तालुका अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत अनेक इच्छुक यांची नावे चर्चेत असून या सर्वांच्या मुलाखती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्या आहे. अशी चर्चा तालुक्यात?या व्यतिरिक्त तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुकांच्या नावाबाबत मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे कोरपना तालुक्याचा भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.