स्वतःच्या शेतातील वाटाणा काढत असताना तोल घसरला, अन् थ्रेशर मशीनमध्ये दबून झाला शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू मजूर पाणी पिण्यासाठी गेला आणि काही क्षणातच सुरेशचा झाला चुराडा

53
स्वतःच्या शेतातील वाटाणा काढत असताना तोल घसरला, अन् थ्रेशर मशीनमध्ये दबून झाला शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू मजूर पाणी पिण्यासाठी गेला आणि काही क्षणातच सुरेशचा झाला चुराडा

स्वतःच्या शेतातील वाटाणा काढत असताना तोल घसरला, अन् थ्रेशर मशीनमध्ये दबून झाला शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

मजूर पाणी पिण्यासाठी गेला आणि काही क्षणातच सुरेशचा झाला चुराडा

स्वतःच्या शेतातील वाटाणा काढत असताना तोल घसरला, अन् थ्रेशर मशीनमध्ये दबून झाला शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू मजूर पाणी पिण्यासाठी गेला आणि काही क्षणातच सुरेशचा झाला चुराडा

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लगतच्या पवनी तालुक्यातील आसगाव लगतच्या मौजा रनाळा या गावातील शेतशिवारात स्वतःच्या शेतातील वाटाणा थ्रेशर मशिनमधून काढत असताना तोल गेला. यामुळे तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुरेश दयाराम वैरागडे ( वय ३४ वर्षे, रा. रनाळा, ता. पवनी ) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

अपघात झालेली थ्रेशर मशिन सुरेश वैरागडे यांच्या स्वतःच्याच मालकीची आहे. शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते. दरम्यान मजूर पाणी पिण्यासाठी गेला असता सुरेश यांचा तोल गेल्याने ते थेट मशिनमध्ये सापडले. यात त्यांचा हात डोके मशीनमध्ये गेल्याने त्यांचा काही क्षणातच त्यांना काही कळण्याच्या आतच चुराडा झाला. हा प्रकार लक्षात आल्यावर एकच हल्लाकोळ उडाला. शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी ध्यान घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे. तरूण शेतकऱ्याचा शेतातील कामावरच असा ओघाती मृत्यू झाल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पोलिसांना भ्रमण ध्वनीने कळविल्यावर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डाॅक्टरांनी मृत घोषित केले. 

*भावाचा १२ वर्षापूर्वीच मृत्यू*

सुरेश वैरागडे यांच्या भावाचा सुमारे बारा वर्षाआधी मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबातील संपूर्ण जबाबदारी सुरेशवरच होती. आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने वैरागडे परिवारावर दुख:चा डोंगरच कोसळला आहे. संपूर्ण गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.