पुणे दिघी महामार्गावर मौजे चांदोरे ग्रामपंचायत हद्दीत पोलीस वाहनाचा अपघात….
✍️नंदकुमार चांदोरकर✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞
माणगाव : चांदोरे ग्रामपंचायत हद्दीत पोलीस वॅनचा अपघात अंदाजे दुपारी १२.३० वा.च्या सुमारास झाला असून हा अपघात म्हसला बाजूकडून माणगावच्या दिशेने गाडी क्र.एम.एच.०६. के.९९७६ हि वॅन माजरोने फाटा येथे डाव्या बाजूला गाडी पलटी झाली, हि बातमी समजतात चांदोरे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सूर्यकांत आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश दिवेकर, मुद्रे पोलीस पाटील मनोहर धुमाळ, चंदू खेडेकर ई. बचाव कार्यासाठी धावून गेले व गाडीत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढुन त्यांचा बचाव केला, वॅनमध्ये एकूण १० पोलीस कर्मचारी होते ५ महिला कर्मचारी आणि ५ पुरुष कर्मचारी. ईश्वर कृपेने कोणालाही दुखापत झाली नाहीं. सगळे सुखरूप आहेत.
यां घटनेची सदर बातमी समजताच म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी साहेब यांनी काही पोलीस कर्मचारी सोबत घेवून घटनास्थळी भेट दिली.व सदरची सखोल तपासणी केली असता त्यांना गाडीची स्टेरींग ही लॉक झाली असे समजले काही वेळातच माणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजकर साहेब यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.घटना स्थळी चांदोरे पोलीस पाटील संतोष आंबेकर, साईचे सागर अधिकारी, मूंद्रे पोलीस पाटील मनोहर धुमाळ, चांदोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश दिवेकर, माजी उपसरपंच सूर्यकांत आंबेकर, अन्नपूर्णा हॉटेलचे मालक आंबेकर, चंदू खेडेकर, एम.एस.ई.बीचे लाईनमन महेंद्र तांबे व त्याचे कर्मचारी यांनी घटना स्थळी विशेष सहकार्य केले. तसेच आजूबाजूच्या गावांतील काही लोक ही बातमी समजताच घटना स्थळी धावून आली.