विविध कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केली पाहणी

59

विविध कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केली पाहणी

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (ता. २०) पाहणी केली. त्यांनी मनीषनगर येथील शिल्पा सोसायटी आणि चिंचभुवन क्षेत्रात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट दिली व निरीक्षण केले. यावेळी संबंधितांना पाईप लाईन टाकल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे पुनर्भरण व समतलीकरण (रेस्टॉरेशन) करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी माजी स्थायी समिती सभापती श्री. अविनाश ठाकरे, मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. अनिल गेडाम, उपअभियंता श्री. आशिष तालेवार, कनिष्ठ अभियंता श्री. कृष्णा कोल्हे उपस्थित होते.