सौ ज्योती म्हात्रे यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

73

सौ ज्योती म्हात्रे यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा ग्रंथालय संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देण्यात येतो . यावर्षीचा हा पुरस्कार प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ ज्योती म्हात्रे यांना जाहीर करण्यात आला आहे
या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सौ ज्योती म्हात्रे या गेली 28 वर्षे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत आहे.