पोस्को महाराष्ट्र स्टीलने महिलांना दिली उद्योजक होण्याची संधी….

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगाव :-शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या वतीने दहिवली परिसरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये अहिल्या महिला मंडळ, पेण येथे अभ्यासदौरा आणि नव्याने सुरु केलेल्या उद्योगासाठी भांडवल स्वरुपात कापड वाटप समारंभ या दोन उपक्रमांचा समावेश होता. यामधून महिलांना उद्योगसंधी, स्वयंरोजगाराचे महत्त्व आणि आर्थिक सक्षमीकरण यांची माहिती देण्यात आली. दहिवली आणि परिसरातील पाच गावांतील १७ महिलांना अहिल्या महिला मंडळाच्या अभ्यासदौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. या भेटीदरम्यान महिलांना व्यवसाय विकास, उद्योजकतेच्या संधी आणि शाश्वत उपजीविकेच्या विविध पर्यायांबद्दल सखोल मार्गदर्शन मिळाले.

या अभ्यासदौऱ्याचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंरोजगार आणि लघुउद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रेरणा देणे हा होता. “Seeing is believing” या तत्त्वावर आधारित या भेटीदरम्यान, महिलांना एक यशस्वी महिलांनी सुरु केलेला व्यवसाय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यांनी व्यवसायातील आव्हाने, संघटनात्मक कामकाज आणि नवीन उद्योजकीय संधी यांचा थेट अनुभव घेतला. पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या प्रयत्नांमुळे या महिलांना नव्या व्यवसाय संकल्पनांचा विचार करण्याची प्रेरणा मिळाली.अभ्यासदौऱ्याबरोबरच, पोस्को महाराष्ट्र स्टीलने दहिवली गावातील महिलांना नव्याने सुरु केलेल्या उद्योगासाठी भांडवल स्वरुपात ३५०० मीटर कापडाचे वाटप केले. या कापडाचा उपयोग कापडी पिशव्या तयार करण्यासाठी केला जाईल. या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल आणि पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना मिळेल. यामुळे महिलांना आपला व्यवसाय सुरू करता येईल आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल उचलता येईल. हा कार्यक्रम १९ फेब्रुवारी रोजी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे वरिष्ठ अधिकारी श्री. जी युन पार्क आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या संधीबद्दल महिलांनी उत्साह व्यक्त करत पोस्कोच्या या उपक्रमामुळे त्यांना उद्योजकतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सहभागी महिलांनी व्यक्त केलेले काही अनुभव पुढीलप्रमाणे होते – “पोस्कोचा हा उपक्रम आम्हाला नवीन दिशा दाखवणारा आहे,” “या अभ्यासदौऱ्यात आम्हाला एका यशस्वी महिलांनी चालवलेल्या संस्थेचा अनुभव घेता आला,” तसेच “कापडाच्या मदतीने आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करता येईल,” आणि “व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शिकता आले.”पोस्को महाराष्ट्र स्टील नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करणे हे पोस्कोचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here