उमरी(भ) येथे 20 लाखाच्या विकास कामाचे भूमिपूजन.
✒अनिल अडकीने सावनेर तालुका प्रतिनिधी✒
सावनेर, दि.19 मार्च:- नागपुर जिल्हातील सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमरी(भ) येथे 19 मार्च ला सकाळी 9 वाजता शीर्षक 2515 अंतर्गत तीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम 15 लक्ष तसेच दलित वस्ती योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम 5 लक्ष असा एकूण 20 लक्ष रुपयाचे सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन मनोहररावजी कुंभारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, गोविंदरावजी ठाकरे माजी पंचायत समिती सदस्य, भगवान चांदेकर सामाजिक कार्यकर्ते उमरी. सौ अरुणाताई शिंदे सभापती पं.स. सावनेर, प्रकाशराव पराते उपसभापती पं.स. सावनेर, सौ. संगीताताई घुगल सदस्य ग्रामपंचायत उमरी, गोविंदराव ढोके उपसरपंच उमरी यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या भूमिपूजना प्रसंगी यादवरावजी ढोके माजी सभापती पं.स.सावनेर, सीमा टोंगे-ग्रा.पं.सदस्य, ऋषी लोखंडे ग्रा.पं.सदस्य, संजय टेंभेंकर सामाजिक कार्यकर्ते, प्रवीण घुगल, कीर्ती ढाले, रेवेनाथ खीङडेकर, सोमेश्वर वाघमारे, हरिभाऊ डोळसे, सेलोटे साहेब अभियंता पं.स. सावनेर, पोतले साहेब अभियंता जि.प.बांधकाम विभाग, किशोर कचरे धनंजय आसोले ग्रा.पं.सदस्य आदींची उपस्थिती होती.