वर्धा जिल्हात वादळी वा-यासह जोरदार पाऊस, शेतकरी चिंताग्रस्त.
✒प्रशांत जगताप✒
वर्धा, दि.19 मार्च:- शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील वादळी वा-यासह जोरदार पाऊस आला. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याची माहित येत आहे. वर्धा जिल्हातील हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी (रेल्वे), वर्धा, देवळी, पुलगाव, कारंजा तसेच आर्वी तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वेळीच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंगणघाट भागात काल रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील गहू, चणा तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिउत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने उघड्यावर पडून असलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले. वर्धा जिल्हात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पपई, संत्रा, चणा, गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतांतील गोठ्यांवरील तसेच पाच घरांवरील टिनपत्रे उडाली.
वादळीवाऱ्यासह पावसामुळे गहू, चणा तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू व चणा भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.