कामगार नेता किशोर बागडे यांची कामगार क्षेत्रात उंच भरारी.
✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/ कळमेश्वर:- कामगार – कर्मचारी चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणे महत्वाचे असते हा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता म्हणजे किशोर बागडे आणि स्वप्निल चौधरी हे आहे. महाराष्ट्राला कामगार चळवळींचा मोठा इतिहास आहे. कामगार-कर्मचारी चळवळीचा इतिहास लिहिताना यांच्या कर्मचारी संघटनेच्या उभारणीची दखल निश्चितच घेतली जाईल. संघटना पक्षातीत ठेवणे आणि गरज पडल्यास समाजाच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची शिकवण यापुढेही मार्गदर्शक आहे. आज औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पण भांडवलदार आज गरिब कामगार आणि मजुराचे हक्क आणि न्याय देण्यात कुठेतरी कुचकामी भुमीका घेत आहे. त्यामुळे आज कामगाराचे जिवन हे कष्टमय आणि हलाखीचे आहे.
कळमेश्वर येथील कामगारांना न्याय, हक्कासाठी नेहमी धाऊन जाणारे, समाजसेवेतुन सामाजिक व कामगाराचा जलंत प्रश्नाना वाचा फोडणारे दिलदार व्यक्तीमत्व म्हणुन कळमेश्वर क्षेत्रात ओरख असणारे किशोर बागडे, स्वप्निल चौधरी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडतानाचा आक्रमकपणा आणि संयम यांचा संगम त्यांच्या नेतृत्वात आहे. हे कळमेश्वर क्षेत्रातील कामगारांना न्यायासाठी लढा उभारून लढत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कामगार क्षेत्रात उडी किशोर बागडे, स्वप्निल चौधरी यांनी अनेक क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून कळमेश्वर टेक्सटाईल मील गोंडखैरी येथील एन.एस.टी प्लॅन त्याप्रमाणे कळमेश्वर एमआयडीसी मधील कंपनी मध्ये मजुरांच्या कामाकरिता आंदोलन उपोषण करण्यात आले. यामुळे किशोर भाऊ बागडे यांच्या माध्यमातून शेकडो कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम यांनी केले. त्यामुळे कळमेश्वर क्षेत्रांमध्ये व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वप्निल चौधरी यांनीसुद्धा कामगारांच्या प्रश्ना करिता उपोषण आंदोलन करण्यात आली. किशोर भाऊ बागडे यांची कामगारा बदल असलेली तळमळ बघुन स्वप्निल चौधरी हे या कामगार चळवळीत आल्याचे त्यांनी सांगितले. आज कळमेश्वर येथील किशोर भाऊ बागडे आणि स्वप्निल चौधरी या कामगार नेत्यांन मुळे कामगार क्षेत्रांमध्ये उच्चांक घातल्याचे दिसून येत आहे.
नागपुर जिल्हातील हजारो कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या ऐतिहासिक नेतृत्वाचा उदय झाला आहे. यांनी हे कार्य यापुढेही असेच चालू ठेवले पाहिजे. किशोर बागडे आणि स्वप्निल चौधरी हे आज कामगारांचे आणि कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ आहे. अशी प्रतीक्रीया कामगारांनी मिडीया वार्ता न्यूज ला दिली.