नागपुर 10 दिवसात 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित, पोलीस दलात एकच खळबळ.

48

नागपुर 10 दिवसात 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित, पोलीस दलात एकच खळबळ.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी ✒
नागपूर,दि.20 मार्च :- महाराष्ट्रातील नागपुर पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात अनेक आरोप लागत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. त्यामुळे दहा दिवसांत 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विविध प्रकरणात निलंबन झाल्याने नागपुर पोलीस विभागात खळबळ माजली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृहनगरात पोलिस विभागात नेमके चालले तरी काय हा प्रश्न नागपुरातील जनता विचारत आहे.

लकडगंज झोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील ओल्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश लाडे, हेडकॉन्टेबल रत्नाकर मेश्राम आणि प्रदीप राव या तिघांना निलंबित केले आहे. त्यानंतर गोरेवाडा भागात जखमी अवस्थेत सापडलेल्या वृद्ध भैय्यालाल बैस यांना वेळीच मदत न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेत मानकापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह एकूण चौघे निलंबित केले आहे. तर ठाण्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर खंडणी वसूल केल्याचा आरोप लागलेले एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. या सर्व प्रकरणामुळे नागपूर पोलिसांची प्रतीमा मलिन झाली आहे.