कार चालवीत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने  झाडावर आदळून तलाठ्याचा मृत्यू.

53

कार चालवीत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने  झाडावर आदळून तलाठ्याचा मृत्यू.

Talatha died after colliding with a tree due to a severe heart attack while driving.

✒ आशीष अंबादे प्रतिनिधि ✒

मोर्शी:- चांदूरबाजार मार्गावर कार चालवीत असताना तलाठ्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने कारची कडूलिंबाच्या झाडाला धडक लागली व यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवाजीनगर येथील रहिवासी नरेश अण्णाजी इंगळे हे तलाठी पदावर उदखेड येथे कार्यरत आहे.

शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान उदखेड येथे कार्यालयात जात असताना मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावरील बालाजी पार्कजवळून कार जात असताना इंगळे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कारचे नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत 55 वर्षीय नरेश अण्णाजी इंगळे यांचा मृत्यू झाला. 
शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा तालुक्यातील अंबाडा व खेड येथे दौरा असल्याने त्यांना माहिती मिळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तलाठी नरेश इंगळे यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी मोर्शी तहसीलदार सिद्धार्थ मोरे तसेच तहसीलच्या महसूल कर्मचार्‍यांनी गणेश इंगळे यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. नरेश इंगळे यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असून मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे . नरेश इंगळे यांच्या आकस्मिक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे