हिंगणघाट शहरातील साई जैल्वर्लस मध्ये चोरी, साडे तिन लाख रुपये किंमतीचे सोने चांदी व बेंटेक्सचे दागिने लंपास.
✒ आशीष अंबादे प्रतिनिधि ✒
हिंगणघाट:- शहरातील गजबजलेल्या गोलबाजार येथिल साई जैल्वर्लस मध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरी करून साडे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहे.आज सकाळी १० वाजता साई जैल्वर्लसचे मालक सोमनाथ संदाशिव लोंढेकर हे दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. यासंबधी सोमनाथ संदाशिव लोंढेकर यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बुधवारी रात्रीच्या सुमारास चोरट्याने साई जैल्वर्लस या सोन्या चांदीच्या दुचाकानाची मागची भिंत फोडून दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना दुकानात शिरता आले नसल्याचे चोरट्याने बाजूच्या कपड्यांच्या दुकांनाची भिंत फोडून कपड्यांच्या दुकानात प्रवेश केला येथिल वरच्या छपराची टिन वरती करून साई जैल्वर्लस या दुकानातील पिओपी फोडुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील दिड कीलो चांदी, 60 ग्रॅम सोन्याचे दागिने 40 हजार रुपये किंमतीचे बेन्टेक्सचे दागीने असे एकूण साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.जैल्वर्लसचे मालक सोमनाथ संदाशिव लोंढेकर यांच्या तक्रारी वरुन हिंगणघाट पोलिस ठाण्याचे ठाणेदार संपत चव्हान यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे हे घटनेचा तपास करीत आहे.