” धुलीवंदन नंतर वैनगंगा नदीत पोहायला गेगेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु “
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞
तुमसर :- भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील एक तरुण युवा हा दिनांक १८ मार्च २०२२ रोज शुक्रवारला दुपारी १२:०० च्या सुमारास आपल्या चार ते पाच मित्रासोबत मौजा माडगी येथील वैनगंगा नदीपात्रात पोहायला गेला होता. त्या तरुणाचे नाव चाहुल हरिश इलमे वय १८ वर्षे रा. बजाज नगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे. तिसऱ्या रेल्वे ट्रॅकच्या मोठ्या कॉलम जवळ खोल पाणि आहे. चाहुल हा नदीपात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चाहुल गटांगळ्या खाऊ लागला. त्या दरम्यान त्याचे चार पाच मित्र मदत करण्याकरीता धावले. त्यांनी आरडा ओरडा केली. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यु झाला होता.
चाहुल सोबत वैनगंगे नदीत पोहायला गेलेल्या मित्रांनी चाहुलच्या काकाच्या मुलाला मोबाइलवर हि माहिती दिली. कुणाल इलमे तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर माडगी येथील कोळी बांधवांना बोलावून चाहुलला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र त्याचा मृत्यु झाला होता. सदर घटनेची नोंद करडी पोलीस स्टेशन यांनी घेतली असुन पुढील तपास करडी पोलीस करीत आहे.