वाघाच्या हल्ल्यात बैल ठार.
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट : तालुक्यातील सेलू मुरपाड येथील शेतशिवारामध्ये शेतात बांधून असलेल्या बैलावर वाघाने अचानक हल्ला करून ठार केले हि घटना शनिवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली, सेलू मुरपाड येथील शेतशिवारामध्ये समुद्रपूर तालुक्यातील पोथरा येथील शेतकरी शरद पुसदेकर यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या बैलांना शेतामध्ये बांधून ठेवले व ते आपल्या घरी निघून आले असता वाघाने अचानक हल्ला करून एका बैलाला जागीच ठार केले यामध्ये शेतकरी शरद पुसदेकर यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सेलू, मुरपाड, मानोरा, सातेफळ या भागांमध्ये वाघाने अनेक हल्ले केल्याचे दिसून येते यासंदर्भात वनविभागाला माहिती सुद्धा देण्यात आली, वनविभागाने शोधमोहीम राबउन सुद्धा वाघाचा शोध लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने शोधमोहीम अधिक तीव्र करावी व वाघला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.