नागभिड राम मंदिर चौक ते शिवटेकडी पर्यतच्या रस्त्यांसाठी 5.50 कोटींचा निधी मंजूर.
आमदार बंटी भांगडीया यांचे विशेष प्रयत्न
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड:-चिमूर लोकसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या माध्यमातून नाग भिड राम मंदिर चौक ते ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त शिवटेकडी पर्यतच्या रस्ता बांधणी साठी राज्य सरकार ने पाच कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,नागपूर यांना मंजुरीचे पत्र दिले आहे,
नागभीड शिवटेकडी परिसरात ग्रामीण रुग्णालय,न्यायालय,तहसील ऑफिस,गोविंदराव वारजूरकर महाविद्यालय,भूमी अभिलेख कार्यालय इत्यादी महत्वाचे विभाग असून नेहमी या रस्त्याने वर्दळ असते अनेकदा या रस्त्याची मागणी स्थानिक नेते व जनतेने केली होती.जनतेची ही मागणी लक्षात घेता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी शासन दरबारी ही मागणी केली राज्य शासनाने या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे,
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपल्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी मंजूर केलेल्या या निधीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, नागभीड नागपरिषदेचे नगराध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे,उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,बांधकाम सभापती सचिन आकुलवार,सर्व नगरसेवक व मॉर्निंग वाँक संघटना तसेच नागभीड तालुका पञकार संघ च्या पदाधिकारी यांनी बंटीभाऊ भांगडीया यांचे आभार मानले आहेत.