हिंगणघाट येथील चार खेळाडूंची विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड.
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट : मा. खासदार रामदासजी तडस कुस्ती संकुल देवळी येथे घेण्यात आलेल्या वर्धा जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेमध्ये हिंगणघाट येथील चार खेळाडूंची करण्यात आली निवड.
३६ वी अजिंक्यपद विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा ( सन २०२१-२२ ) साठी वर्धा जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा मा. खासदार रामदासजी तडस कुस्ती संकुल देवळी येथे घेण्यात आली व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ जाहीर करण्यात आला या संघात हिंगणघाट येथील , पुरूष वजन गटामध्ये , सारंग साहारे ६५ किलो, प्रज्वल साहारे ७० किलो. महिला वजन गटात संस्कृती चौधरी ५९ किलो, गिता हांडे ५१ किलो वजन गटामध्ये यांची निवड करण्यात आली . निवड झालेले चारही खेळाडू दि. १ ते ४ एप्रिल दरम्यान देवळी येथे होणाऱ्या विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे, तसेच प्रणय गाठे, तुषार चौधरी, आर्या सालेकर यांनीही स्पर्धेत भाग घेऊन आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीला आहे. यावेळी प्रशिक्षक मा. बलराज अवचट, सुबोध महाबुधे , पालक व आजी – माजी खेळाडूंच्या उपस्थितीत विजयी खेळाडूंचा गौरव करण्यात आला, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या .