उमरेड तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेले पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
उमरेड .यावर्षी रब्बी हंगामात झालेल्या पाऊस व गाऱ्याने कहर केला शेतातील पिके उध्वस्त व नासाडी झालेली असून गहू चना व कडधान्याची व भाज्यांचे नुकसान झालेले त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आधी सुलतान आणि संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट आल्याने स्थिती अत्यंत हालाखीची झालेली त्यामुळे शेतकरी पूर्णतः खतबळ झालेले आहे. शासनाने ओला दुष्काळ घोषित करावा व पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. तसेच पीक विमा घेतलेला असल्यास तशी त्यांची तरतूद योग्य रित्या सरकारने व विमा कंपन्यांनी करावी अशी शिवसेना तर्फे शेतकऱ्यांची व्यथा मानण्यात येत आहे . तरी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देत आहोत.माननीय तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन उमरेड तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपीट फटका बसल्याने कर्जमाफी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब देण्याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे ,शहर प्रमुख संदीप गुंफलवार, उपतालुकाप्रमुख गोपाल पाल , तेजराम डडमल , महादेव झाडे ,राजेश देशपांडे ,चंद्रविकास दांडेकर , सुरेंद्र ब्रह्मे ,बाबा रोहाड व इतर शिवसैनिक.