तुमच्या सारखे 56,,पायाला बांधून फिरते मी,, आमदार. चित्रा वाघ.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात आज चांगलाच वादंग झाल्याचे पाहायला मिळत आहे.सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियन प्रकरणावरून जोरदार खडाजंगी सुरु झाली. सत्ताधाऱ्यांकडून नांव न घेता थेट शिवसेना उबाठा आ. आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं जात असून, विरोधी पक्षातील काही आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने उतरलेले दिसून आले.त्यात शिवसेना उबाठा गटाचे आमदार. अनिल परब यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांचे नांव घेतल्याने, चित्रा वाघ चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाले. सत्ताधारी पक्षातील मंत्री, संजय राठोड,मंत्री जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही. त्यांचा पहिले राजीनामा घ्या. विरोधी पक्ष कमकुवत आहे म्हणून कसंही दाबू नका. असं म्हणत अनिल परब यांनी सरकारवर लक्ष केले.
संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत त्याच उत्तर दिलं आहे.उद्धव ठाकरेंना विचारा संजय राठोडना का क्लीन चिट दिली.असेल हिम्मत तर विचारा त्यांना, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सभागृहात शिवसेना उबाठा गटाचे आमदार. अनिल परब यांच्यावर पलटवार केला.तसेच माझं नांव घेऊन बोलण्यात आलं, म्हणून मी अनिल परबाना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित माझा कुटुंबाने 2 वर्ष सहन केले, तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते मी,आम्ही वशिल्यानी इथे आलेलो नाही आहोत,असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला.
अनिल परब यांना सांगायचं आहे, संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ लढतच होती,मी लढाई लढली आहे. पण, कोणी क्लीन चिट दिली,जे समोर आलं त्यावर मी भूमिका मांडली,मी कोर्टात गेले आणि काय काय सहन करावं लागलं मला ते मलाच माहिती. असे म्हणत चित्रा वाघ यांनी भूतकाळ सांगितला.आम्हाला हलक्यात घेऊ नका, बोलायला लागलो तर समोरच्या सीट खाली होतील.एस आय टी रिपोर्ट येउद्या बोलो तर यांची हि हालत आहे. मुध्यावर बोला, कुटुंबावर येऊ नका, आमचा नवरा काय करतो, मुलगा काय करतो,त्याच्यावर कशाला बोलता त्यावर काय येता असेही आमदार. चित्रा वाघ यांनी सभागृहात बोलताना म्हंटले.