गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रस्ते, नाली, पुलीया बांधकामाचे समस्त प्रलंबित
कामे राज्य सरकारने पूर्ण करावे व नवीन कामांना मंजुरी द्यावी
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : 19 मार्च 2025 गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री नामदार आशिषजी जयस्वाल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक निमित्ताने आले असता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे नवनियुक्त विदर्भ पदाधिकारी व उपसरपंच ग्रामपंचायत गांधीनगर नेताजी पाटील सोंदरकर, संघटनाचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनात सहपालकमंत्री नामदार आशिषजी जयस्वाल,जिल्हाधिकारी अभिशांतजी पंड्या यांची सदिच्छा भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आतापर्यंत प्रलंबित असलेल्या व पूर्ण न झालेल्या कामाबाबत तसेच नवीन विविध कामांना मंजुरी देण्याबाबत व काही प्रलंबित समस्यांबाबत निवेदन दिले व त्यांच्या निदर्शनास आणून दिले व विविध विषयावर चर्चा केले यावेळी सहपालकमंत्री महोदय यांनी समस्त प्रलंबित प्रलंबित कामे तात्काळ करण्यात येतील व नवीन कामे सुचवण्यात यावे असे निर्देश दिले असे सकारात्मक आश्वासन दिले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, कृष्णा भाऊ वाघाडे, नानू उपाध्ये, भीमराव वनकर,स्वप्निल मडावी,अमोल अनोले व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,