आमदार समीरभाऊ कुणावार यांनी उपलब्ध करुन दिले ऑक्सीजन सिलेंडर.
हिंगनघाट येथे डॉ मरोठी हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्णालय सुरु अनेक उधोजकानी दिला मदतीचा हात.
✒ मुकेश चौधरी ✒
विदर्भ ब्युरो चीप प्रतीनिधी
हिंगनघाट:- आमदार समीरभाऊ कुणावार यांनी ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुण दिल्यानंतर येथील डॉ. मरोठी यांचे अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर येथे कोरोना रुग्णालय सुरु झाले आहे. या करिता शहरातील खाजगी उधोजकानी मदतीचा हात दिला आहे.
हिंगनघाट तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालय अंतर्गत कोविड रुग्णालयातील खाटा सुद्धा कमी पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आ. समीरभाऊ कुणावार सहित ज़िल्हातिल सर्व आमदार, खासदार रामदास तडस, तसेच ज़िल्ह्या रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी उपस्तित होते. यावेळी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी हिंगनघाट येथे खाजगी कोविड रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी ज़िल्हाधिकाऱ्याना निवेदनातून केली. तसेच हिंगनघाट येथील काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची कोविड रुग्णालय सुरु करण्याची तयारी असल्याचेही यावेळी सांगितले. ज़िल्ह्याधिकारी वर्धा यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्यानंतर हिंगनघाट उपज़िल्हा रुग्नालयाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला. यानुसार डॉ. मरोठी यांचे अरिहंत क्रिटिकल सेंटर मधे १० खाटाचे कोरोना रुग्नालयाला मंजूरी प्रदान करण्यात आली. परंतु ऑक्सीजन सिलेंडरचा मोठा तूटवड़ा असल्याने रुग्णालय कार्यान्वित करण्याची गंभीर समश्या निर्माण झाली. तेव्हा आमदार समीरभाऊ कुणावार यांनी विविध उधोजकांशी संपर्क साधुन ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.
शहरातील उधोजकानी लगेच प्रतिसाद देत तब्बल तीस औधोगिक ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले. यात गिमाटेक्स इंडस्ट्रीज, पी वी टेक्सटाइल्स जाम, सगुना फुड्स वन, दुलानी मेडिकल्स, वरुण राठी यांनी मदतीचा हात देऊन सिलेंडरचा पुरवठा केला. या बद्दल आमदार समीरभाऊ कुणावार यानी सर्व उधोजकांचे आभार मानले. आमदार समीरभाऊ कुणावार यांनी दि. 19-04-2021 ला स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर चे संचालक ड़ॉ राहुल मरोठी, डॉ मधुसूदन गोयनका, माज़ी नगरसेवक प्रा. किरण वैद्य, समाजसेवी संजय बोथरा, पुंडलिक बकाने उपस्तित होते.