राजुरा तालुक्यात 5 महीन्याच्या गरोदर महीलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या.
तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर, ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा/विरुर:- पोस्टे विरुर हद्दीतील चिंचोली (बुजरूग) गावात आज दिनांक 19 रोजी 12 वाजताच्या सुमारास चिंचोली येथील मनोज आत्माराम आसुटकर यांची पत्नि पौर्णिमा मनोज आसुटकर हीने, मि चौवा अस्टा खेळायला जातो असे सांगून घरा बाहेर निघाली आणि काही वेळाने गावातील लोकांनी सरकारी विहिरित आवाज आईकला जाउन पाहता पौर्णिमा मनोज आसुटकर आहे असे माहित होताच ,गावातल्या लोकांनी तिच्या पतिला बातमी दिली व पति मनोज आसुटकर सोबत गावातील काही लोकांनी दोरीच्या मदतीने तिला वाचवीण्याचा प्रयन्त केला परंतु तिच्या मृत्यु झाला.
मृतक महिला ही 5 महीन्याची गरोदर होती.
पंचनामा तयार करून प्रेत उतरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे रवाना करण्यात आले . सदर प्रकरणी मर्ग दाखल करून पुढील चौकशी करण्यात येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा यांनी घटनास्थळी भेट दिली असता मृतकाच्या नातेवाहीकांना विचारपूस करण्यात आली. तसेच विरुर स्टेशन पो स्टे थानेदार तिवारी सोबत सह कर्मचारी पो. हवा. दिवाकर पवार, प्रमोद मिलमिले, विजय मुंडे आणि वरिष्ट्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.