श्री रामचंद्र देवस्थान राळेगाव तर्फे शुद्ध व थंड पाण्याची मशीनचे लोकार्पण.
राळेगाव बस-स्थानक येथे शुद्ध व थंड पाण्याची मशीनचे भेट.

✒हर्षल घोडे, राळेगाव तालुका प्रतिनिधी✒
राळेगाव,दि19 एप्रिल:- शुद्ध पाणी व थंड पाणी हे जीवनात महत्वाचे घटक आहे, त्यामुळे शुध्द पाण्याने कोणत्याही रोग होऊ शकत नाही. कोरोना ह्या संसर्ग जन्य रोगामुळे हे महत्वाचे पाऊल आहे. राळेगाव येथील बस-स्थानकात जनतेला शुद्ध व थंड पानी मिळणार आहे. हे कार्य श्री रामचंद्र देवस्थान राळेगाव यांचे कडून होत आहे, त्या कार्यक्रमचा लोकार्पण सोहळा दि. 20 मंगळवार सकाळी 10 वाजता आ. डॉ. अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विष्णुजी देशमुख (रा.स्व. संघाचे विभाग प्रचारक) यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. तसेच कानडजे तहसिलदार राळेगाव, मोकळ मुख्याधिकारी नगरपंचायत, तुनकलवार ठाणेदार राळेगाव, उजवणे आगार व्यवस्थापक प्रमुख उपस्थिती होणार आहे.