ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड रुग्णालयाच्या उभारणीबाबत सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री राजेश टोपेंना पत्र.

ब्रम्हपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांनी केली होती जंबो कोविड सेंटर उभारण्याची मागणी. माजी कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिले होते मागणी बाबत निवेदन.

माजी पालकमंत्री कामात तर विद्यमान पालकमंत्री कोमात, अशी जिल्ह्यातील परिस्थिती.

ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड रुग्णालयाच्या उभारणीबाबत सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री राजेश टोपेंना पत्र.
ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड रुग्णालयाच्या उभारणीबाबत सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री राजेश टोपेंना पत्र.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. यातच ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. ब्रह्मपुरी तालुका चंद्रपूर जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेला आहे. अशा परिस्थितीत ब्रह्मपुरी येथे हवी ती आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्याने, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी ब्रह्मपुरी येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे केली होती. या बाबत माजी आमदार देशकर यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राज्याचे आणि कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही या बाबत पत्र दिले होते.

या संदर्भात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ब्रह्मपुरी येथे जम्बो कोविड सेंटर उभारा या करिता पत्र लिहिले आहे. ब्रह्मपुरी येथे तात्काळ जंबो कोविड सेंटर उभारण्यात यावं अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक टोकावर असलेले ठिकाण आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर ब्रह्मपुरी असल्याने वडसा,आरमोरी, कुरखेडा सहित भंडारा-गोंदिया पासून कोरोना रुग्ण ब्रह्मपुरी येथे उपचाराकरिता येत आहेत मात्र अशा परिस्थितीत ब्रह्मपुरी येथे हवी तशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा उपचारा अभावी मृत्यू होतो आहे. ब्रह्मपुरी येथे कोविड सेंटर असून सुद्धा तेथे वेंटीलेटरची व्यवस्था नाही. शहरात कोरोना पेशंटला बेड मिळणे आता कठीण झाले आहे.

या बाबींकडे लक्ष वेधत माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here