भद्रावती मंगल कार्यालय घ्या पण कोरोना हॉस्पिटल उघडा, मंगल कार्यालय मालकाची मागणी.
भद्रावती मंगल कार्यालय घ्या पण कोरोना हॉस्पिटल उघडा, मंगल कार्यालय मालकाची मागणी.

भद्रावती मंगल कार्यालय घ्या पण कोरोना हॉस्पिटल उघडा, मंगल कार्यालय मालकाची मागणी.

भद्रावती 300 खाटांचे कोरोना हॉस्पिटल उघडण्याची मागणी.

भद्रावती मंगल कार्यालय घ्या पण कोरोना हॉस्पिटल उघडा, मंगल कार्यालय मालकाची मागणी.
भद्रावती मंगल कार्यालय घ्या पण कोरोना हॉस्पिटल उघडा, मंगल कार्यालय मालकाची मागणी.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती):- दिवसेंनदिवस वाढत चाललेल्या कोरोना महामारीने रुग्णांना बेड न मिळाल्याने वाटेतच मृत्यू झाल्याच्या घटना वाढत असल्याने येथील मंगल कार्यालयाचे मालक राजू गुंडावार, संजय गुंडावार तसेच रविंद्र शिंदे यांनी स्वतःचे तिन्ही कार्यालय प्रशासनाने घेऊन तिथे तीनशे खाटांचे कोरोना हॉस्पिटल उघडण्याबाबत प्रशासनाला विनंती केली आहे.

शहरात एक मात्र जैन मंदिर येथे प्राथमिक कोरोना हॉस्पिटल असल्याने अति गंभीर रुग्णाला तिथे ठेवल्या जात नाही. तसेच इथे मुबलक खाटा उपलब्ध नसल्याने दररोज कोरोना रुग्णांना जिल्हा तसेच जिल्हया बाहेर दररोज भटकंती करावी लागत आहे या भटकंती ने कित्येक रुग्णाचा जीव सुद्धा जात आहे तरी प्रशासनाने ऑक्सिजनच्या सोयीसुविधा उपलब्ध करून ते 300 खाटांचे कोरोना हॉस्पिटल उघडण्याची मागणी गुंडावार परिवाराने तसेच येथील रवींद्र शिंदे यांनी सुद्धा आपले कार्यालय कोरोना हॉस्पिटलसाठी देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच येथील रुग्णाला दररोज भोजनाच्या व्यवस्था सुध्दा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here