कोविड-19 च्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येवून आढावा घ्यावा.
कोविड-19 च्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येवून आढावा घ्यावा.

कोविड-19 च्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येवून आढावा घ्यावा: वंचित बहुजन आघाडीची मागणी.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांची जिल्हाधिकारीमार्पâत पालकमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून मागणी.

कोविड-19 च्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येवून आढावा घ्यावा.
कोविड-19 च्या परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येवून आढावा घ्यावा.

मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे अजूनही गडचिरोलीकडे फिरकले नसून जिल्ह्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ३ हजारचा टप्पा गाठलेली आहे. तर मृत्यूची नोंद 213 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे होणारा दुर्लक्ष टाळून स्वत: भेट द्यावी व कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांनी जिल्हाधिकारीमार्पâत पालकमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. जिल्ह्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 3 हजारा 104 असून मृत्यू झालेल्यांची संख्या आतापर्यंत 213 झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीचे सावट निर्माण झाले असून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही सांत्वनात्मक मार्गदर्शन केलेले नाही. जिल्ह्यास भेटसुध्दा दिली नाही. तसेच कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी योग्यरितीने होत आहे काय? याबाबत काही आढावा घेतल्याचेही दिसून येत नाही.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपचाराबाबत हेळसांड होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांना तोंडी कळवित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यास भेट देवून कोविड-19 संदर्भात आढावा घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे, उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे व इतर पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारीमार्पâत पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here