तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र बापूजी बट्टे अध्यक्षपदी तर प्रल्हाद गोविंद कन्नाके उपाध्यक्षपदी बिनविरोध

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं. ९५१८३६८१७७

तालुका गोंडपिपरी येथील गोंडपिपरी सेवा सहकारी संस्थेच्या मागील झालेल्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुरेशराव चौधरी यांचे नेतृत्वाखाली काँग्रेस समर्थित पैनल नी विरोधकांवर मात करून तेरापैकी बारा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणले.

सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत व इतर पक्षांनी काँग्रेसच्या यशस्वी कारकीर्दीला व शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे यांच्या सहकार्यात्मक कार्य कुशलतेच्या विरोधात न जाता नामनिर्देशन सुद्धा दाखल करू शकले नाही.काँग्रेसचे नामनिर्देशन दाखल केलेले बारापैकी बाराही सभासद बिनविरोध निवडून आले.

गोंडपिपरी सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसचे बिनविरोध वर्चस्व

दिनांक १९/०४/२०२२ ला सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री देवेंद्र बापूजी बट्टे यांची अध्यक्षपदी तर प्रल्हाद गोविंद कन्नाके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेस समर्थित पॅनल च्या विजयी सभासदांमध्ये श्री. सुरेशराव चौधरी, राजीवसिंह चंदेल, राजेश्वर बट्टे, गुणाकर पानसे, विपिन चौधरी, गौरव वासेकर, शीलाताई बांगरे, मंदाताई कुडे, दीपक फलके, आनंदराव डोके असे १२ पैकी सर्व उमेदवार सभासद बिनविरोध विजयी झाले.

हे आपण वाचलंत का?

 

या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ श्री. वासुदेवराव सातपुते,श्री. बारूजी झाडे (गुरुजी) व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. तुकाराम झाडे यांचे उत्तम सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here