श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात बुधवार दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीर उपलब्ध

रशाद करदमे
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्युज
९०७५३३३५४०
श्रीवर्धन: आझादी का अमृत महोत्स्व कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार महाराष्ट्र शासन आरोग्य विभागा मार्फत आपल्या श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात बुधवार दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीर उपलब्ध करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरामध्ये कान, नाक, घसा, पोटाचे विकार, मुतखड़ा, लहान मुलांचे आजार, डोळ्यांचे विकार स्त्रियांचे आजार, किउनी विकार, हाडांचे आजार हृदयरोग, दातांचे विकार तसेच लहान मुलाचे आजार अशा अनेक रोगां वर मोफत वैदयकिय निदान व उपचार केले जातील.
सदर शिबीरा चे उद्घाटन सन्मा. खा. श्री. सुनील जी तटकरे लोकसभा सदस्य यांच्या हस्ते संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सन्मा. नाम. कु. आदिती ताई तटकरेराज्य मंत्री महाराष्ट्र तथा पालक मंत्री रायगड जिल्हा, तसेच प्रमुख उपस्थिती सन्मा. आमदार श्री अनिकेत भाई तटकरे, विधान परिषद सदस्य,कोकण स्थानिक स्वराज्य संस्था हे लाभणार आहेत.
कार्यक्रमासाठी डॉ. श्री.मधुकर ढवळे वैदयकिय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, श्री. अनिकेत पाटिल गटविकास अधिकारी, पंचायत समिती, डॉ. सुरज तडवी. तालुका आरोग्य अधिकारी श्रीवर्धन यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?
- पूर्व विदर्भातील १९ तालुके नक्षल प्रभावित घाेषित
- भारतामध्ये एक व्हायरस पसरत आहे…सोनिया गांधी यांचे देशाच्या नागरिकांना आवाहन
- अशोक परांजपे पुण्यतिथी विशेष: आतून कीर्तन वरून तमाशा’ नाट्यलेखक!
सदर च्या कार्यक्रमा चे नियोजन मा. तहसीलदार साहेब श्री सचिन गोसावी. मा. गटविकास अधिकारी साहेब श्री. उद्धव होळकर.व सर्व वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन यांनी केले आहे.
तरी गरजू लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा.