रमाई नगर च्या विकासा साठी किशोर भाऊ जोरगेवार यांनी दिले आस्वासन
रमाई नगर चे शिष्ट मंडळ व आनंद बावणे मनसे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या मध्यस्थीने दिले निवेदन
मनोज एल खोब्रागडे
सह संपादक
मोबाईल नं 8208166961
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की रमाई नगर ही वस्ती बसून 50 वर्ष होऊन गेले पण आजपर्यंत कोणत्याच पार्टीच्या नेत्यांनी या वस्ती च्या विकासासाठी पुढे आलेले नव्हते म्हणून रमाई नगरातील शिवा झोडे,युवा झोडे, शंकर झाडे, चरणदास मडावी आणि रमाई नगरातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या वस्तीचा विकास कसा केल्या जाईल यावर चर्चा करून येथे पंचशील झेंडा व रमाई नगर च्या फलकाचे उदघाट्न माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्थे करण्याचे ठरवले आणि त्यानंतर या वस्तीच्या विकासासाठी सुरवात झाली व यानंतर थोर महापुरुषांचे कार्यक्रम घेऊन वस्ती च्या विकासाला सुरवात झाली आणि अशातच आनंद भाऊ बावणे मनसे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना चंद्रपूर यांनी या रमाई नगर ला भेट देऊन येथील नागरिकांची हालचाल विचारून आणि स्वता समोर होऊन मी या वस्तीच्या विकासासाठी माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन या वस्तीच्या विकासाची धुरा आपल्या खांद्यावर घेतले व येथील नागरिकांचे शिष्ट मंडळ घेऊन माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांना निवेदन देऊन येथील समस्यावर चर्चा केली व किशोर भाऊ नी यावर सकारात्मकता दर्शवली व रमाई नगर येथील लाईट चे पोल, पिण्याच्या पाण्याची सिन्टेक्स,व रमाई नगरातील नाल्या च्या कामाची लवकरात लवकर करून देण्याचे आस्वासन दिले या आस्वासनाने रमाई नगरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी रमाई नगरातील शिवा झोडे चरणदास मडावी , युवा झोडे , मनोज खोब्रागडे , शंकर झाडे , खेमराज मेश्राम ,धनराज झोडे, अमित मडावी ,सौरभ मडावी ,अनिकेत खोब्रागडे, आरव खोब्रागडे, संजय चवरे , साजन चवरे , रितिक चवरे अनिल ढाक, अनिल खांडरे ,सुरेंद्र पेंदोर ,लखन शेंडे,वतन शेंडे, आकाश शेंडे ,गुरुदेव दुर्योधन, निरंजनलाडे,अंकुशआवळे ,अतुल,डेंनी ,करणं, कुणाल, खुशाल झाडे, अल्का झोडे,वर्षा झोडे,अशाबाई झोडे,शीतल झाडे,जयाबाई घरडे ,ललिता ढोके ,योगिता ढाक,ललिता मेश्राम, सोनी मेश्राम, देविकाबाई चवरे,आशाबाई खाडरे ,रेखाबाई शेंडे, आशाबाई शेडमाके ,साधना कन्नाके, पुष्पा मडावी , पूजा पेंदोर ,मिनाबाई कन्हाके ,अल्काबाई दुर्योधन कांताबाई भैसारे आणि तसेच समस्त रमाई नगररातील महिला व पुरुष आणि युवकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे