टँकरमुक्त म्हसळा तालुक्या मधील म्हसळा शहरातील जनतेचे तोंडचे पाणी पळाले. म्हसळेकरांना जावे लागत आहे पाणी टंचाई ला सामोरे. पाण्यासाठी महिला कधीही उतरु शकतात रस्तावर .

टँकरमुक्त म्हसळा तालुक्या मधील म्हसळा शहरातील जनतेचे तोंडचे पाणी पळाले. म्हसळेकरांना जावे लागत आहे पाणी टंचाई ला सामोरे. पाण्यासाठी महिला कधीही उतरु शकतात रस्तावर .

टँकरमुक्त म्हसळा तालुक्या मधील म्हसळा शहरातील जनतेचे तोंडचे पाणी पळाले.

म्हसळेकरांना जावे लागत आहे
पाणी टंचाई ला सामोरे.

पाण्यासाठी महिला कधीही उतरु शकतात रस्तावर .

टँकरमुक्त म्हसळा तालुक्या मधील म्हसळा शहरातील जनतेचे तोंडचे पाणी पळाले. म्हसळेकरांना जावे लागत आहे पाणी टंचाई ला सामोरे. पाण्यासाठी महिला कधीही उतरु शकतात रस्तावर .

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :म्हसळा तालुक्यातील अन्य ३९ ग्रामपंचायतीपेक्षा शहरांतील भाग विकासासाठी पिछाडीवर असताना विकासाच्या कोणत्याही योजनेत फायद्या पेक्षा नुकसान जास्त आसाच नागरिकांचा आभ्यास होत आहे .
म्हसळा संपूर्ण तालुका १२ ते १५ वर्षापूर्वी टँकरमुक्त झाला आहे म्हसळा शहराला ३० वर्षाचे कालावधीत जिल्हापरिषद ग्रामिण पा .पु योजना राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन आशा सर्व सुमारे १०० कोटी रुपयांच्या योजना होऊन सुद्धा आज मितीस म्हसळा करांचे तोंडचे पाणी पळाल्याची स्थिती आहे. आता नव्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी ४३ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
नगरचायतीचे दिलासे देणारे काम
म्हसळा नगर पंचायतीने शहरांतील काही नागरी वस्तीचे भागांत विंधण विहीरी खोदल्या असून त्यातून त्या भागांतील नागरिकाना पंपाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामध्ये म्हसळा दिघीरोड, नवानगर परिसरांत ७ ते ८ ठिकाणी तर सानेआळी – दातार आळी आणि हरीजन वस्तींत एक ठिकाणी विंधण विहीरी मार्फत पाणी पुरवठा केला जातो . त्यामुळे त्या भागातील नागरिकाना पाणी टंचाई पासून थोडा दिलासा मिळत आहे. भविष्यांत ब्राह्मण आळी, तांबट आळी, सोनार आळी.कन्या शाळा परिसर, उमरोटकर- बोरकर वस्ती,नागेश पोतदार बिल्डिंग, मातोश्री पार्क या परिसरांत किमान ७-८ विंधण विहीरी खोदून परिसरांत पर्यायी सोय करावी आशी मागणी पुढे येत आहे. पाभरे येथून सुरु असलेल्या योजनेतील ३०H.P चे दोनही पंपात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे म्हसळा कराना केवळ एकवेळ अपुरे,गढूळ -पिण्यास आयोग्य असे पाणी मिळत आहे.पाणी सोडणे आणि पंप देखभाल दुरुस्तीसाठी ठेका पद्धतीने काम दिले आहे. अटी नियमा नुसार संबधिताच्या अनास्थेमुळे आणि पंपाची पर्यायी सोय नसल्याने नागरिकाना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे . शहरांत अनेक भागांत कृत्रिम पाणी टंचाई होत आसल्याने पाण्यासाठी महिला कधीही रस्त्यावर
उतरू शकतात असे वातावरण झाले आहे . तर दुसरी कडे म्हसळा नगरपंचायतीच्या ७ विहीरी , खाजगी ६
विहीरी ,नगरपंचायतीच्या ९ ते १० विंधण विहीरी आणि शहरात ८७ खाजगी विंधण विहीरी पाणी टंचाईची तिव्रता कमी करीत आहेत.
————————————-
काही तांत्रिक अडचणी मुळे दोन दिवस पाणी एक वेळ करण्यात आले होते त्यामुळे ग्रामस्थांना थोडे त्रास सहन करावा लागला आहे, पण एक ते दोन दिवसात पाणी पुरवठा नियमित दोन वेळा सुरू राहील.
विठ्ठल राठोड.
मुख्याधिकारी, नगरपंचायत म्हसळा.
———————————-
टॅंकर मुक्त म्हसळा तालुका झाला असला तरी आज देखील पाणी टंचाई हा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे, म्हसळा ग्रामपंचायत ही आता म्हसळा नगरपंचायत बनली आहे तरी देखील अशा प्रकारे समस्या निर्माण होत आहेत, नगरपंचायत ने कर वारेमाप वाढविले आहे . यावर देखील विचार करावा.
प्रदिप कदम.
म्हसळेकर.

चौकट: