साई बौद्धजन पंचायत समिति शाखेची फेर निवड.

साई बौद्धजन पंचायत समिति शाखेची फेर निवड.

साई बौद्धजन पंचायत समिति शाखेची फेर निवड.

साई बौद्धजन पंचायत समिति शाखेची फेर निवड.

✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞

माणगांव :- माणगांव तालुक्यातील साई विभागातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.7, चार गाव ग्रुप साई विभाग या शाखेच्या पदाधिकारी यांची फेर निवड 19 एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, भोईवाडा परेल या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद जाधव यांनी काम पाहिले तसेच बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे कोषाध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
साई बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 7 चे अध्यक्ष विहुले बौद्धावाडीतील संदेश जाधव, उपाध्यक्ष काकल बौद्धावाडीतील उमेश मोरे, सचिव उसर बौद्धवाडीतील पांडुरंग मोरे, उपसचिव साई बौद्धावाडीतील मंगेश मोरे, खजिनदार साई बौद्धावाडीतील मंदार मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच कोषाध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी नियुक्ती पत्र व ओळखपत्र देऊन सन्मानित केले व पुढील धार्मिक कामासाठी शुभेच्छा दिल्या. मागील 5 मार्च 2024 रोजी माणगांव येथील डॉ. आंबेडकर भवन येथे शाखेच्या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली होती. परंतु साई बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.7 च्या दोन पदाधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे फेर निवड करण्यात आली.या नवनियुक्त पदाधिकारी यांना साई विभागातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.